म्हसळा प्रतिनिधी अपघातासाठी कर्दनकाळ असणाऱ्या माणगाव - म्हसळा रस्त्यावरील घोणसेघाटातील तीव्र वळणावर टँकर व कारची घडक होऊन कारचे चा...
म्हसळा प्रतिनिधी
अपघातासाठी कर्दनकाळ असणाऱ्या माणगाव - म्हसळा रस्त्यावरील घोणसेघाटातील तीव्र वळणावर टँकर व कारची घडक होऊन कारचे चालकासह अन्य दोन प्रवासीजखमी झाल्याची घटना काल सायं.७च्या दरम्यान घडली. कार चालक प्रशांत चांदोरकर वय ३९रा. रोहीदास नगर , श्रीवर्धन याने दिलेल्या तक्रारीवरून म्हसळा पोलीसानी अपघाताची नोंद करून भादवी कलम २७९, ३३७, ३३८, मो.वा. का.कलम१८४, १८५ प्रमाणे गुन्हा ची नोंद करुन राहुल विश्वनाथ इंगळे, रा. जे.एम. म्हात्रे, प्लँट देवधर याना अटक केली आहे.प्रशांत चांदोरकर हे स्वीफ्ट डीझायर नंMH06 BU4048 कार श्रीवर्धन हून माणगावला जात होते. तर MHO69963 हा टॅंकर माणगाव कडून म्हसळा कडे येत असताना घोणसे घाटातील वळणावर ठोकर झाली. यामध्ये कार चालक प्रशांत चांदोरकर यांच्यासह कारमधील श्रीवर्धन पोलीस स्टेशनचे पोसई उमेश खेरड व पोलीस कॉस्टेबल बापूसाहेब शिंदे हे दोन प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात आले. अपघाताचा तपास पो. ना. शामराव कराडे करीत आहेत.


COMMENTS